Wednesday 15 June 2011

maanaspujaa bharadidevi


श्री भराडी देवी मानसपूजा 
श्री गणेशाय नमः |
जय जय मूळ प्रकृती ईश्वरी महामाया महादेवी सनातनी |
ब्रह्मा विष्णू शिव यांनी पूजिली  विष्णू माया नारायणी |
सर्व काही तुझीच रूपे तू सर्वाची अधिष्टात्री ईश्वरी |
आधाराभूता सर्वाची सर्व विश्व स्वरूपिणी |
परात्परा  सर्वमन्त्रमयी  सर्वशक्ती स्वरूपिणी |
स्वेच्छामयी श्रेष्ठा  सती सत्य स्वरूपी अंबिके
तू सगुण आणि निर्गुण कृष्ण प्रिया कृष्ण शक्ती |
कृष्ण बुद्धीची अधिष्ठात्री  कृष्ण अर्धांगातून प्रकटली |
श्री कृष्ण तुज स्तविली  तू कृपेची माउली |
आम्हावरी कृपा करी तू कल्पवृक्षाची सावली |
तुझी तप्त सुवर्णा सारिखी कांती  कोटी सूर्याची प्रभा दीप्ती |
प्रसन्न वदनी मंद स्मिती भक्तानुग्रहकारिणी |
दुर्गतीचां नाश करी म्हणोनी तुझे नाम दुर्गादेवी |
शतभूजा तू शिवप्रिया शिव प्राण स्वरूपिणी |
मस्तकी अर्धचंद्र मुगुट शोभे त्रिगुणमयी  त्रिलोचना |
बिम्बाकार सुहास्यवदनी  शिव मनमोहिनी प्रिया तू |
रत्न कुंडले कानी शोभली कि तुझ्या तेजाने तेजाळली |
दंतपंक्ती  तुझ्या पाहुनी मौक्तिक माला मौन झाली |
मोतियाची नथशोभली  चाफेकळी तू सौंदर्य खाणी |
ओठ तुझे लाल चुटूक  परम मंगलमयी प्रसन्न वदनी |
बहुमूल्य रत्नमय आभूषणे रत्नमय बाजूबंद कंकणे |
मुद्रिकाही तशा रात्न्मयी शोभविती शतभुजा 
अग्निशुद्ध दिव्य वस्त्र धारण करिसी कस्तुरी चंदन उटी शोभतसे |
गजगामिनी कान्तीमती शान्तस्वरुपा योग सिद्धी योगिनी |
विधात्याची तू सृष्टीकर्त्रीशक्ती सर्व जगाची जननी |
समस्त लोकाचे कल्याण करिसी महावूष्णूची जनी होसी |
परम सुंदरी चंद्र मुखी शरद पौर्णिमेचे चंद्रबिंब फिके |
एसी तू सौन्दर्यखाणी त्रिपुर सुंदरी मनोहारिणी जगदम्बा भवानी |
भाळी तुझ्या कुंकुम चंद्रमा कस्तुरी उटी चंदन अंगी |
कमलनयनी काजळ ल्याली आरूढसी हृदयसिंहासनी |
अंबे भगवती सनातनी शिवलोकातुनी आलीस तू |
सुरेश्वरी माझी पूजा स्वीकारुनी कृपा आशीर्वाद ते मजसी |

 जगत्पूज्ये महाश्वरी यर बैस माझ्या हृदय कोंदणी|  |
वास तुझा राहो निरंतरी सदभाव माझे तव पूजेला |

Tuesday 7 June 2011

Devi Stuti

या देवी सर्व भूतेषु शक्तीरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै  नमस्तस्यै नमो नमः ||
या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||

जी सर्व भूतीं पाहें | शक्तीरूपे राहिली आहे ||
तिजकारणे नमस्कार हे | अमुचे असोत सर्वदा ||
जी सर्व भूतीं स्थिर | राहे मातृरूपे निरंतर ||
तिजकारणे नमस्कार हे | आमुचे असोत सर्वदा ||

Monday 6 June 2011

jatra












history of bharadidevi

श्री भराडीदेवी अंगणेवाडी , मालवण 
कोकणातील 'प्रतिपंढरपूर' म्हणजे अंगणेवाडीची श्री भराडी देवीची जत्रा होय .लाखो लोक या जत्रेला आवर्जुन येतातच .हिची जत्रा साधारणपणे माघ महिन्यात असते .शेतातील कामे झाल्यानंतर सर्व गावकरी एकत्र जमतात व देवीच्या नैवेद्यासाठी पारधीचा म्हणजेच शिकारीचा दिवस ठरवतात .शिकार झाल्याशिवाय हे लोक परत येत नाहीत.शिकार झालेल्याचे मांस शिजवून गावकरी आस्वाद घेतात मग जत्रेचा दिवस ठरविला जातो.गावकरी लोकाच्या निर्णयाला 'डालप 'असे म्हणतात 
जत्रेच्या दिवशी देवीच्या स्वयंभू पाषाणावर मुखवटा घालून साज शृंगार केला जातो या दिवशी गाव न्हावी सूर्योदयाला आरसा घेवून सूर्याची परावर्तीत किरणे देवीवर टाकतो व जत्रेला आरंभ होतो पहाटे चार ते दहा वाजे पर्यंत पूजेचे आयोजन केले जाते गावातील प्रत्यक गृहिणी सामुदायिक स्वयंपाकासाठी सहभागी होते .हेच अन्न प्रसाद म्हणून देतात यालाच मालवणी मध्य 'ताटे लावणे 'असे म्हणतात दुसर्या दिवशी पहाटे चार वाजल्या पासून पूजेला सुरुवात होते ती दुपार पर्यंत चालते या दिवसाला 'मोडे जत्रा 'असे म्हणतात हि जत्रा दीड दिवसाची असली तरी अनेक करमणुकीचे कार्येक्रम आयोजित केले जातात तरीपण हि जत्रा चार पाच दिवस चालते कर्नाटकहून लोक जत्रेला येतात ह्या जत्रेची परंपरा चारशे वर्षा पासून सुरु आहे पूर्वीच्या काळी गावातील एक गाय एका विविक्षित ठिकाणी दुधाची धार सोडत असे मालकाने ते पाहिले त्याला त्या दिवशी स्वप्न दृष्टांत झाला ज्या ठिकाणी गाय दुधाची धार सोडत असे त्या पाषाणा लाच देविस्वरूप मानले जाऊ लागले व ती लोकांच्या नवसाला पाऊ लागली या ओबढधोबढ पाषाण म्हणजेच भराडी देवी होय हिची कीर्ती दिवसे न दिवस वाढत आहे